Tuesday, 27 January 2009

Judging the cover of the book

नेहमीप्रमाणे आजही बसमध्ये भरपूर गर्दी होती आणि मनातल्या मनात माझी चरफ़ड चालली होती.
एक दिवस बसायला जागा मिळेल तर...पण नाही.
मी उभी होते आणि नेहमीप्रमाणे गर्दीच निरीक्षण चालल होत.
माझ्या बाजुच्या सीटवर उजवीकडे एक तीशीचा तरुण बसला होता आणि हातात असणाऱ्या वहीतील
स्केचेस पहात होता. माझ्या उजव्या हातात ऑफ़ीसची बॅग होती. काही वेळाने त्या तरुणाने माझ्या बॅगेकडे हात दाखवुन काही तरी सान्गायचा प्रयत्न केला.माझ्या बॅगेचा त्याला त्रास होतोय अस मला वाटल."आता काय डोक्यावर घेउ बॅग?", मी मनात म्हटल.बर दुसऱ्या हातात घ्यावी तर उतरणाऱ्या प्रवशान्ना त्रास.मी न पाहील्यासारखे करुन तशीच उभी राहिले.परत थोड्या वेळाने याची बॅगेबद्दलची खुणवाखुणवी सुरु झाली.मी विचार केला,"काय लोक असतात,प्रत्येकजण आपापली सोय पहातो.जरा दुसऱ्याची अडचण समजुन घेतली तर काय होईल?". मी रागानेच बॅग एका हातातुन दुसऱ्या हातात घेतली.तेवढ्यात तो तरुण म्हणाला,"मॅडम, तुमचा मोबाईल वाजतोय केव्हाचा .फोन आलाय वाटत कोणाचा तरी."
त्याचे शब्द ऐकले आणि मला उगीचच अपराध्यासारख वाटू लागल.
किती पटकन आपण एखाद्याबद्दल एखाद मत बनवतो नाही.ह्या सर्व प्रसन्गावरुन फार पूर्वी वाचलेल एक वाक्य आठवल."Don't judge just the cover of the book..."

Saturday, 24 January 2009

प्रेमाचा गुलकन्द-प्र.के.अत्रे

आज बऱ्याच दिवसानी ही कविता वाचली आणि इथे पोस्ट करण्याचा मोह आवरला नाही.

प्रेमाचा गुलकन्द

बागेतुनि वा बाजारातुनि कुठुन तरी ’त्या’ ने
गुलाबपुष्पे आणुनि द्यावीत ’तिज’ला नियमाने

कशास सान्गु प्रेम तयाचे तिजवरती होते?
तुम्हीच उकला बिन्ग यातले काय असावे ते!

गुलाब कसले?प्रेमपत्रिका लालगुलाबी त्या!
लाल अक्षरे जणू लिहिलेल्या पाठपोट नुसत्या!

प्रेमदेवता प्रसन्न होई या नैवेद्याने!
प्रेमाचे हे मार्ग गुलाबी जाणति नवतरणे!

कधी न त्याचा ती अवमानी फुलता नजराणा!
परि न सोडला तिने आपुला कधिही मुग्धपणा!

या मौनातच त्यास वाटले अर्थ असे खोल!
तोहि कशाला प्रगट करी मग मनातले बोल!

अशा तर्हेने मास लोटले पुरेपूर सात,
खन्ड न पडला कधी तयाच्या नाजुक रतिबात!

अखेर थकला!ढळली त्याची प्रेमतपश्चर्या,
रन्ग दिसेना खुलावयाचा तिची शान्त चर्या!

धडा मनाचा करुनि शेवटी म्हणे तिला,"देवी!
(दुजी आणखी विशेषणे तो गोन्डस तिज लावी)

"बान्धित आलो पूजा मी तुज आजवरी रोज!
तरि न उमगशी अजुनि कसे तू भक्तान्चे काज?

गेन्द गुलाबी मुसमुसणारे तुला अर्पिलेले
सान्ग अरी सुन्दरी,फुकट का ते सगळे गेले?"

तोच ओरडुनि त्यास म्हणे ती,"आळ व्रुथा हा की!
एकही न पाकळी दवडली तुम्ही दिल्यापैकी!"

असे बोलुनी त्याच पावली आत जाय रमणी
क्षणात घेउनि ये बाहेरी कसलीशी बरणी!

म्हणे,"पहा मी यात टाकले ते तुमचे गेन्द,
आणि बनविला तुमच्यासाठी इतुका गुलकन्द!

कशास डोळे असे फिरविता का आली भोन्ड?
बोट यतले जरा चाखुनी गोड करा तोन्ड!"

क्षणौक दिसले तारान्गण त्या,-वरी शान्त झा्ला!
तसाच बरणी आणि घेउनी खन्द्यावरि आला!

"प्रेमापायी भरला" बोले, "भुर्दन्ड न थोडा!
प्रेमलाभ नच!गुलकन्द तरी कशास हा दवडा?"

याच औषधावरी पुढे तो कसातरी जगला,
ह्रुदय थाम्बुनी कधीच नातरि तो असता खपला!

तोन्ड आम्बले असेल ज्या्चे प्रेमनिराशेने
’प्रेमाचा गुलकन्द’ तयानी चाटुनि हा बघणे!

कवितासन्ग्रह: झेन्डूची फुले

Friday, 23 January 2009

ट्रिपल फ़िल्टर टेस्ट

ट्रिपल फ़िल्टर टेस्ट
"मैत्री", जगातल सर्वात सुन्दर अस नात.याच मैत्रीबद्दलची ही एक कथा.
प्रसिद्ध तत्त्ववेत्ता सॉक्रेटिसकडे एकदा एक जण आला आणि त्याला सान्गु लागला, "तुम्हाला माहीत आहे का तुमच्या जिगरी दोस्ताबद्दल आज मी काय ऐकलय ते?","एक मिनिट थाम्ब",सॉक्रेटिस म्हणाला,"तू जे काही मला सान्गणार आहेस त्यापुर्वी मी एक छोटिशी टेस्ट घेउ इच्छीतो.ट्रिपल फ़िल्टर टेस्ट. माझ्या मित्राबद्दल आणि तेही मला माहीत नसलेली अशी गोष्ट तू सान्गतो आहेस.तुझा हेतु कदाचित चान्गलाही असेल,पण ते शब्द आपण अगोदर गाळुन घेउ,म्हणजे चान्गल तेवढच आपल्या पदरात पडेल.पहिल्या चाचणीच नाव ’सत्य’", सॉक्रेटिसने त्या ग्रहस्थाला विचारल "तू जे काही मला सान्गणार आहेस ते सत्य आहे याची शम्भर टक्के खात्री तुला आहे का?","नाही,खर तर माझ्या फ़क्त ते कानावर आलय आणि..","ठीक आहे,म्हणजे तु जे काही सान्गतोयस ते केवळ ऐकीव आहे आणि त्यातली सत्यता तुला ठाऊक नाही.आता आपण दुसरी चाचणी घेउ.या चाचणीच नाव आहे ’चान्गुलपणा’.माझ्या मित्राबद्दल जी गोष्ट तू सान्गणार आहेस ती चान्गली आहे का?", सॉक्रेटिसन विचारल."नाही.उलट मी तर..".त्या ग्रहस्थाचे पुढचे शब्द तोन्डातच अडकले."पुढे जायच की नाही हे ठरवण्यासाठी आपल्याकडे आणखी एक चाचणी आहे,’उपयोगिता’.मला सान्ग, माझ्या मित्राविषयी तू जे काही सान्गु पहातोय त्याचा मला काही उपयोग होणार आहे का?", सॉक्रेटिसन त्याला विचारल."नाही.खात्रीन नाही",तत्परतेन तो म्हणाला."दोस्ता,माझ्या मित्राबद्दल तू जे काही सान्गणार आहेस त्याच्या सत्यतेबद्दल तु्ला स्वतालाच खात्री नाही,ते चान्गल तर नाहीच आणि काही उपयोगाचही नाही, मग तू ते मला कशासाठी सान्गतो आहेस? क्रुपा करुन तुझी ही कहाणी तुझ्याकडेच ठेव."

माझ्या मते फ़क्त मैत्रीतच नव्हे तर प्रत्येक नात्यात आपण ही टेस्ट वापरली तर...

कसे सरतील सये -- Sandeep Khare

कसे सरतील सये माझ्याविना दीस तुझे,
सरताना आणि सान्ग सलतील ना,
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर,
गुलाबाची फुले दोन रोज राती डोळ्यावर,
मुसुमुसु पाणी सान्ग भरतील ना भरतील ना...

पावसाच्या धारा धारा मोजताना दिस सारा
रिते रिते मन तुझे ऊरे
ओठ भरे हसे हसे ऊरातुन वेडेपिसे
खोल खोल कोण आत झुरे
आता जरा अळीमीळी
तुझी माझी व्यथा निळी
सोसताना सुखावुन हसशील ना...

कोण तुझ्या सौधातुन उभे असे सामसुम
चीडिचूप सूनसान दिवा
आता सान्ज ढळेलच आणि पुन्हा छळेलच
नभातुन गोरा चान्दवा
चान्दन्यान्चे कोटिकण
आठवान्चे ओले सण
रोज रोज नीजभर भरतील ना?

इते दूरदेशी माझ्या सुन्या खिडकिच्यापाशी
झडे सर काचभर तडा
तुच तुच तुझ्या तुझ्या तुझी तुझी तुझे तुझे
सारा सारा तुझा तुझा सडा
पडे माझ्या वाटेतुन
आणि मग काट्यातुन
जातानाही पायभर मखमल ना...

आत नाही बोलायचे जरा जरा जगायचे
माळुनिया अबोलीची फुले
देहभर हलू देत विजेवर झुलू देत
तुझ्या माझ्या विरहाचे झुले
जरा घन झुरु दे ना
वारा गुदमरु दे ना
तेव्हा नभ धरा सारी भिजवील ना...

One shot, One life

अलिकडेच वाचनात आलेल्या व मला भावलेल्या एका गोष्टीतील काही भाग येथे देत आहे.

"आयुष्यातील प्रत्येक गोष्ट करताना अशी करायची की समजायच, ही गोष्ट आयुष्यात एकदाच आणि अखेरची.मग बघा काय फरक पडतो ते.समजा या कपातुन मी चहा पित आहे तो एकदाच आणि शेवटचा बर का.मग पहा त्याची चव कशी लागेल ती.त्याचा आनन्द कसा मिळतो ते.प्रत्येक दिवस,प्रत्येक गोष्ट,परिक्षेचा प्रत्येक पेपर,प्रत्येक इन्टर्व्यु,प्रत्येक निर्णय,प्रत्येक तास,प्रत्येक क्षण हा एकमेव आणि अखेरचा म्हणुनच जगायच.एक क्षण,एक आयुष्य,एक आयुष्य,एक क्षण.मनाला धार लावायची तर प्रत्येक क्षण ,प्रत्येक सेकन्द प्रेमान, तन्मयतेने जगायला हवा. प्रत्येक क्षणात जीव,प्रत्येक क्षणात पूर्ण आयुष्य ओतायला हव."